बळीराजा शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी अजित बोरकर. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

बळीराजा शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी अजित बोरकर.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : बळीराजा शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी अजित बोरकर यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आल्याने त्यांच्या निवडीचे माळशिरस तालुक्यातून स्वागत होत आहे.
बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह पंढरपूर याठिकाणी संपन्न झाली. या बैठकीसाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी.जी.पाटील, राज्य कार्याध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, नूतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळनवर, युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर, सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख, युवा जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, मगन काळे आदी कार्यकारणी सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते यासाठी अनेकांनी अर्जही केले होते परंतु तालुकाध्यक्ष पदाची मागील कालावधीत जबाबदारी सांभाळत असताना अजित बोरकर यांनी शेतकरी हिताच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून तालुक्या तील ठिबक सिंचनाचा, रस्त्या, ऊस दरवाढीचा प्रश्न या शेतकरी हिताच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता याच धर्तीवर त्यांना पुनश्च एकदा माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीने दिले आहे. याबद्दल अजित बोरकर यांचे तालुक्यात ठिकाणी त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
तर माळशिरस तालुक्यात सातत्याने शेतकरी हिताच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने व अनेक आंदोलने यशस्वी केल्याने बळीराजा शेतकरी संघटनेने माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे या संधीचं सोनं करून शेतकऱ्यांना कायमच न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी निवडी प्रसंगी केले.

No comments:

Post a Comment

Advertise