शंकरराव मोहिते महाविद्यालयाकडून भूमी उपयोजन सर्वेक्षण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

शंकरराव मोहिते महाविद्यालयाकडून भूमी उपयोजन सर्वेक्षण.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : गोरडवाडी ता. माळशिरस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर अभ्यासक्रमानुसार शंकरराव मोहिते महाविद्यालयातील भूगोल विभागातील बीए भाग 3 विद्यार्थ्यांनी दि. 13 रोजी भेट देऊन महाविद्यालय व गोरडवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी उपयोजन सर्वेक्षण प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात आले. सदर प्रात्यक्षिक कार्यात भूगोल विभागातील 31 विद्यार्थी व दोन प्राध्यापक सहभागी झाले होते. 
आधुनिक काळात इतर शासकीय ज्ञानाबरोबर भूगोल शास्त्रीय ज्ञानाला विविध क्षेत्रात महत्व प्राप्त झाले आहे. कारण या ज्ञानाचा विविध पातळीवर आर्थिक व इतर प्रकारचे नियोजन करण्यासाठी उपयोग केला जातो. सर्वेक्षणाच्या व उपयोग रचनेच्या दृष्टीने लष्करात व महसूल खात्यात या विषयाच्या ज्ञानाचा उपयोग केला जात आहे. मोठ्या प्रदेशाच्या अभ्यासापेक्षा लहान प्रदेशांच्या अभ्यासातून सूक्ष्म ज्ञान मिळवता येते म्हणून यावर लक्ष केंद्रित करून फक्त याचा सखोल अभ्यास करणे हे साध्य भूगोल अध्ययनात महत्त्वाचे मानले जाते. अशा लहान प्रदेशांच्या अभ्यासातून पुढे मोठ्या प्रदेशांच्या सखोल अभ्यासास मदत होते. या हेतूने गोरडवाडी गावच्या जमिनीच्या उपयोजनाचे निरीक्षण करून माहिती देण्यात आली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, विभाग प्रमुख डॉ. संतोष गुजर यांचे मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण कार्य पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी गोरडवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच  रामभाऊ गोरड, ग्रामसेवक रवींद्र पवार,  तुकाराम पिंगळे,  तलाठी शहा व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सर्वेक्षण कार्य यशस्वी करण्यासाठी भूगोल विभागातील प्रा. डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख, प्रा.बाळासाहेब साळुंखे व  विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise