Type Here to Get Search Results !

बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार द्या -बिरसा क्रांती दलाची मागणी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पलूस प्रतिनिधी : महामानव बिरसा मुंडा यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणी बिरसा क्रांती दल पलूस तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे केली.
          त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पलुस तालुका संचालक विश्वनाथ वाळकोळी हे उपस्थित होते. आंबवणे म्हणाले, महामानव बिरसा मुंडा यांचा जन्म 1875  रांची येथे  झाला. जल जंगल जमीन यासाठी जनआंदोलन उभे केले या आंदोलनाला देशभर प्रसार झाला. ते आंदोलन ऊलगुलान म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे बिरसा मुंडा यांचे कार्य महान आहे. इयत्ता पाचवी  बालभारती पुस्तकामध्ये बिरसा मुंडा धडा मुलांसाठी आला आहे. बिरसा मुंडा इंग्रजांबरोबर लढले तू आदर्श  महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला. बिरसा मुंडा  यांचे नाव झारखंड आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले आहे. दिल्ली येथील  लोकसभेच्या बाहेर  काही ठराविक महामानवांचे पुतळे आहेत त्यामध्ये बिरसा मुंडा पुतळा आहे यावरून आपल्या लक्षात येत आहे बिरसा मुंडा यांचे कार्य हे देशासाठी महान होते. बिरसा मुंडा  यांना भारतरत्न पुरस्कार देऊन केंद्र सरकारने सन्मानित करावे अशी मागणी महाराष्ट्रातल्या आदिवासी जनतेकडून होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies