'महाराष्ट्राच्या फेवरेट' जोडीने रेड कार्पेटवर उमटवली आपली छाप. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 18, 2019

'महाराष्ट्राच्या फेवरेट' जोडीने रेड कार्पेटवर उमटवली आपली छाप.माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आणि दिमाखदार सोहळा  म्हणजे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' नुकताच हा सोहळा नेहमीप्रमाणे दणक्यात पार पडला आहे. इतक्या मोठ्या,शानदार सोहळ्यात उपस्थित असणारी सेलिब्रिटी मंडळी हा सगळ्यांच्याच चर्चेचा विषय असतो.विशेषतः त्यांचा रेड कार्पेटवरील वावर,हा अनेकांसाठी मन मोहून टाकणारा क्षण असतो.'झी टॉकीज' वाहिनी आयोजित करत असलेल्या, 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्याला मिळत असलेलं ग्लॅमर पाहता,रेड कार्पेटकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदा सुद्धा रेड कार्पेटची शान तशीच आगळी होती. यात भर टाकण्याचं काम केलं, ते कोठारे पतीपत्नी यांनी! आदिनाथ आणि उर्मिला कोठारे त्यांच्या खास पोशाखात अवतरले आणि सारेच अचंबित झाले. उर्मिला आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील जोडी सगळ्यांचीच लाडकी आहे. 'महाराष्ट्राचा  फेवरेट कोण २०१९' या सोहळ्यात या जोडीने आपल्या सगळ्या चाहत्यांची मनं अधिक जिंकून घेतली. 

No comments:

Post a Comment

Advertise