पुरंदावडेत रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

पुरंदावडेत रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन.

माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/वार्ताहर: पुरंदावडे ता.माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात आल्याची माहिती देवीच्या पुजारी जगुबाई मोहिते यांनी दिली.
सदर यात्रा महोत्सवास दि. ८ पासून प्रारंभ होत असून देवीस चोळी पातळ व फळांचा नैवैद्य, त्याच प्रमाणे माण घेण्यासाठी पालखी माहेरघरला  नाळेमळ्यात जाते. सोमवार दि.९ रोजी करमणुकीचा जनजोगती यांची गाणी व याच दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य व महाअभिषेक होईल. दि.रोजी सकाळी ७ ते ४ गावातुन रथ व पालखी प्रदक्षिणा देवीचा छबीना रथातुन पुरंदावडे गावातुन निघणार आहे. या दिवशी पालखी माण घेण्यासाठी माणकऱ्याच्या घरी जाते. सायकांळी  ५ वाजता किचाचा  कार्यक्रम होईल. यावेळी शिवाजी बाजी मोहिते, दादासाहेब शिवाजी मोहिते, अदित्य दादासाहेब मोहिते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise