शिवाजी विद्यापीठाचे डॉ. ए.एम.गुरव यांची स्वेरीला सदिच्छा भेट. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

शिवाजी विद्यापीठाचे डॉ. ए.एम.गुरव यांची स्वेरीला सदिच्छा भेट.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रात्यक्षिकाद्वारे नॉलेज मिळवण्यासाठी त्यांच्यावर लहान मोठ्या प्रकल्पांची जबाबदारी सोपवणे आवश्यक आहे. कारण सध्या एम.बी.ए.च्या मुलांना जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असून पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रचंड प्रमाणात नोकरी उपलब्ध झालेली आहे. यासाठी एम.बी.ए. ची विद्यार्थी तयार करताना त्यांच्यामध्ये व्यवसाय वाढीच्या दृष्टीने परीपक्वता आणली पाहिजे असे शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणून एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.’ असे प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.एम.गुरव यांनी केले.
 गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या एम.बी.ए. विभागाला अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी सदिच्छा भेट दिली.  एम.बी.ए. विभागाचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. गुरव यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. गुरव यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना एम.बी.ए. मधील विद्यार्थ्यांची जडणघडण करताना शिक्षकांची नेमकी भूमिका काय असावी? याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. गुरव यांनी एम.बी.ए.च्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना ‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट’ म्हणजे काय?  व ते कसे करावे?  याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरु असलेल्या एम.बी.ए. मधील विद्यार्थ्यांचा वाढता उत्साह आणि प्रगती पाहता विद्यार्थी व एम.बी.ए. विभागाचे त्यांनी प्रचंड कौतुक केले. यावेळी प्रा.दुपडे, स्वेरीचे विश्वस्त व एम.बी.ए.चे प्रा. सुरज रोंगे, प्रा. एम.एम. भोरे, प्रा. आर. एन. मिसाळ, प्रा.एस.ए.जगताप,  प्रा.पी.एस.मोरे, प्रा.ए.एन.गायकवाड आदी प्राध्यापक वर्ग व एम.बी.ए. विभागातील सर्व विद्यार्थी, उपस्थित होते.
डॉ. गुरव यांनी स्वेरी कॅम्पसमधील अभियांत्रिकी व फार्मसीमधील महत्त्वाच्या विभागांसह संशोधन विभाग, सेन्ट्रल लायब्ररी आदी विभागांना भेट देवून माहिती जाणून घेतली. स्वेरीच्या शैक्षणिक प्रगतीचा वाढता आलेख पाहून ते भारावून गेले.

No comments:

Post a Comment

Advertise