Type Here to Get Search Results !

श्री नागोबा देवाच्या यात्रेला 11 डिसेंबर पासून प्रारंभ; नागोबा देवस्थान ट्रस्टची माहिती.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : श्री नागोबा ता. माण येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या नागोबा देवाची बुधवार  दि. ११ डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे, अशी माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगरसेवक  ईश्वरा खोत यांनी दिली. 
मागील दोन-तीन वर्षे पावसाअभावी शेतकरी वर्ग फार मोठ्या संकटात सापडला होता. मात्र यंदाच्या वर्षीही पावसाने समाधानकारक हजेरी लावली  असल्याने, दुष्काळी परिस्थितीतीही आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेल्या जनावरांच्या मालकांसह शेतकरी वर्गाला जातीवंत खिलार जनावरांच्या यात्रेचे वेध लागले आहेत. ही नागोबा यात्रा ११ डिसेंबर  ते १७ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे. यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.११ डिसेंबर रोजी देवाची सासनाची पूजा व आरती करून यात्रेस सुरूवात होणार आहे.  ११ ते १२ रोजी शेळ्या-मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरणार आहे. दि १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये भव्य जातीवंत खिलार जनावरांची यात्रा भरणार आहे.
शनिवार  दि. १४ डिसेंबर रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने भव्य निकालही कुस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात 51 हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती कै.जगन्नाथ बयाजी कोळेकर रा.बाळेवाडी ता.आटपाडी यांचे स्मरणार्थ श्री दत्तू जगन्नाथ कोळेकर व नागेश दत्तू कोळेकर यांच्या  वतीने लावण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती 25551 हजार रूपयांची देवापूर गावचे  सरपंच किसन रामचंद्र चव्हाण  यांच्या तर्फे तृतीय क्रमांकाची 15 हजार रुपयांची कुस्ती  पिंपरी गावचे सुपुत्र व न्यू इंडिया इन्सुरस कंपनीचे सुनील पिसाळ यांच्यातर्फे तर चतुर्थ क्रमांकाची 13  हजार रुपयांची ट्रॅव्हलसचे मालक बबनराव पडळकर यांच्यातर्फे तर पाचव्या  क्रमांकाची कुस्ती 11 हजार रुपयांची कै.जगू सखाराम विरकर यांच्या स्मरणार्थ प्रा.मेजर मोहन विरकर यांच्या तर्फे तर सहाव्या क्रमांकाची कुस्ती 7000 रूपयांची विरकरवाडी गावचे उमाजी रामचंद्र चव्हाण  यांच्या तर्फे लावण्यात  येणार आहेत. मैदानात 100 रूपयां पासून 51 हजारां पर्यंतचा  कुस्त्यांचा जंगी निकाली फड रंगणार आहे. शनिवारी 14 ते 16 डिसेंबर रोजी रात्री ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. 
रविवार  दि. 15 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये नागोबा देवाच्या प्रांगणामध्ये विविध गावांचा गजीनृत्य कार्यक्रम होणार आहे. या गजीनृत्यामध्ये सातारा, सोलापूर,सांगली जिल्ह्यातील सुमारे  50 गजीनृत्य संघ सहभागी होणार आहेत. तर याच कालावधीत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार  दि. 16 डिसेंबर रोजी यात्रेकरूंसाठी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. 16 डिसेंबर रोजी जातीवंत खिलार जनावरांची निवड व बक्षीस समारंभ होणार आहे.
देवाची पाकाळणी मंगळवार  दि. 17 डिसेंबर रोजी होणार असल्याचे ईश्वरा खोत यांनी सांगितले. यावेळी किसन जठरे, मधुकर सरकारने, धर्मू खोत, तुळशीराम गोरड, तुकाराम विरकर, जिजाबा खोत, पांडुरंग विरकर(रोडके), शंकर विरकर (सर), रामा राखुंडे, आण्णा भोरे, बंडू विरकर, किसन ढम, वस्ताद विरकर, मंजाप्पा विरकर, सूर्यकांत खोत, वामन विरकर, बापू विरकर, राजाराम विरकर, वस्ताद विरकर, पोपट झिमल आदीसह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
श्री नागोबा येथे दि. 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये श्री नागोबा देवाची वार्षिक यात्रा  नागोबा देवस्थान ट्रस्ट, माण तालुका मार्केट कमिटी, म्हसवड नगरपरिषद व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान भरणार आहे. या यात्रेच्या नेटक्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies