आटपाडीत आज श्री दत्त जन्मोत्सव सोहळा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

आटपाडीत आज श्री दत्त जन्मोत्सव सोहळा.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे सालाबादप्रमाणे आज बुधवार दि. ११ रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून दुपारी १२.०५ वा दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. 
त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पाहटे ५.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत होणार असून यामध्ये काकड आरती, महाअभिषेक, पूजा विधी, श्री ची आरती, भजन, दत्त नामाचा गजर, पुष्पवृष्टी, श्री चा पाळणा, श्री ची महाआरती, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. यानिमित्त श्री दत्त मंदिर परीसरामध्ये मंडप घालण्यात आला आहे. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरापुढे रांगोळी काढण्यात आली असल्याने मंदिराची शोभा त्यामुळे वाढली आहे. सदरचा सोहळा ‘श्री दत्त मंदिर’ पंचायत समिती आटपाडी येथे आयोजित केला असून भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Advertise