सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा दर्जा सुधारा : जि.प. सदस्य अरुण बालटे ; अन्यथा आंदोलन करणार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा दर्जा सुधारा : जि.प. सदस्य अरुण बालटे ; अन्यथा आंदोलन करणार.माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आटपाडी तालुक्यात सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामांचा दर्जा सुधारा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 
आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील उंबरगाव पासून ते झरे हद्दी पर्यंत, उंबरगाव पासून नेलकरंजी पर्यंत व उंबरगाव पासून पात्रेवाडी हद्दीपर्यंत तालुक्यातून राज्यमार्गची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला व दळणवळणाला मोठा हातभार लागणार असल्याने सदरची कामे चांगल्या प्रतीची होणे गरजेचे आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट सोडून दिली आहेत त्याचा वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. कामे करणाऱ्या यंत्रणेकडून कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी पुलांना रंगरंगोटी करून ती कामे केली असल्याचे भासवण्यात आल्याचा प्रकार काम करणाऱ्या यंत्रणेकडून सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत.
सदर कामाबाबत वारंवार तक्रारी होऊ लागले आहेत या तक्रारीकडे आटपाडीच्या सावर्जनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने काम करणाऱ्या यंत्रणेकडून निकृष्ट दर्जाच्या कामाचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे सदर प्रकरणी कारवाई करणे गरजेचे असून कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अरुण बालटे यांनी दिला आहे.

तालुक्यात होत असणारी कामे उत्कृष्ट होणे गरजेचे असताना आटपाडीचे सहाय्यक अभियंता त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत अशी आमची धारणा आहे.
जि.प. सदस्य अरुण बालटे

आमच्याकडे याबाबत तक्रार दाखल नाही. कामाबाबत तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
एस.ए.पाटील 
सहाय्यक अभियंता आटपाडी

No comments:

Post a Comment

Advertise