उंबरे दहिगावच्या नूतन उपसरपंचपदी ललिता विष्णू ठोंबरे यांची बिनविरोध निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

उंबरे दहिगावच्या नूतन उपसरपंचपदी ललिता विष्णू ठोंबरे यांची बिनविरोध निवड.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : उंबरे दहिगाव ता. माळशिरस येथील  रामचंद्र आप्पाजी ठोंबरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच हे पद रिक्त झाले होते. जागेसाठी ललिता विष्णू ठोंबरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी शिंदे यांनी काम पाहिले. सरपंच विष्णुपंत नारनवर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. ललिता ठोंबरे ह्या भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष विष्णू ठोंबरे यांच्या पत्नी आहेत.
यावेळी सरपंच  विष्णुपंत नारनवर, विष्णू ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र ठोंबरे ,शोभा किसन वाघमोडे, यशोदा छगन बोडरे, हिराबाई ढेकळे, सुनीता समिंदर, भीमराव नारनवर, तुकाराम दशरथ वाघमोडे,  दत्तू ढेकळे, तुकाराम बळी वाघमोडे, पांडुरंग ढेकळे, शंकर ठोंबरे, सोपान वाघमोडे, आप्पाजी ठोंबरे, संजय ठोंबरे,  हनमंत वाघमोडे, तानाजी वाघमोडे, निखिल ठोंबरे, नाना नारनवर, मारुती वाघमोडे, शहाजी नारनवर, रामचंद्र ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, संभाजी नारनवर, केशव ठोंबरे, शिवाजी ठोंबरे, अनिल ठोंबरे, विठ्ठल ठोंबरे, विजय ठोंबरे, सोपान गोरे, पांडुरंग रणदिवे, गणेश गोरे, विजय ढेकळे, प्रताप ठोंबरे, सदाशिव मकर, बापू गोरे, रामचंद्र ठोंबरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise