सांगलीत होलार समाज सभागृह लवकरच साकारणार : ठोकळे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

सांगलीत होलार समाज सभागृह लवकरच साकारणार : ठोकळेमाणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली/प्रतिनिधी : महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी होलार समाजाचे सभागृह कोठे ही नसुन ते सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच साकारणार आहे. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी सांगली महानगरपालिकेत तसा ठराव आणि निधीची मागणी केली आहे. होलार समाजातील लोकांनी याची मागणी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या कडे केली होती.  बऱ्याच दिवसाने याला यश आले आहे. होलार समाजाला सभागृहासाठीच्या जागेसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ,  महापौर सांगिताताई खोत यांच्या कडे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे हे पाठपुरावा करीत असून सभागृहसाठी  सांगलीतील सि.सं.नं.१०ङ/३ब ही जागा मिळणेबाबत प्रस्ताव त्यांनी प्रशासनला दिला आहे.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise