जि.प.शाळा कौठुळीत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

जि.प.शाळा कौठुळीत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  जि.प.शाळा कौठुळी ता. आटपाडी, जि. सांगली येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दि. १६ रोजी संपन्न झाली. सदरची  केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्राच्या केंद्र प्रमूख कमल कृष्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सांगली चे अधिव्याख्याता प्रकाश भूते यांनी मार्गदर्शन केले. तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.दिपाली दिपक कदम होत्या.
प्रारंभी  सर्व जि.प.शाळां, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश  मोटे यांनी केले.   तर प्रकाश भुते व राजकुमार केंगार यांचे स्वागत केंद्र प्रमूख कमल गायकवाड व केंद्रप्रमुख गायकवाड यांचे  यांचे स्वागत सौ.दिपाली कदम यांनी केले. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे स्वागत शाळेचे सहशिक्षक संजयकुमार काळेल व दिपक कबीर यांनी केले.
जिल्ह्याच्या धर्तीवरील प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठीच्या तालुक्यातील केंद्रस्तरीय तज्ञ मार्गदर्शकांना ज्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षण दिले ते प्रशिक्षण प्रकाश  भुते यांनी  विठ्ठलापूर केंद्रातील जिल्हा परिषद शाळा कौठूळी येथे येवून 48 शिक्षकांना प्रत्यक्षात त्यांनी हे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणात त्यांनी  प्रश्नपेढी कशी करावी, प्रश्न कसे तयार करावे, कोणते मुद्दे असावेत याबद्दल अतिशय सखोल असे मार्गदर्शन पीपीटी द्वारे केले.  त्यांच्यासमवेत आलेले सहकारी राजकुमार केंगार यांचाही सत्कार करण्यात आला. केंगार यांनी दीक्षा ॲप आणि इतर APP बद्दलची थोडक्यात माहिती केंद्रातील सर्व शिक्षकांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise