म्हसवड नगरपालिकेचा शिपाई झाला मुख्याधिकारी, यात्रा समिती ची बैठक संपन्न, - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 15, 2019

म्हसवड नगरपालिकेचा शिपाई झाला मुख्याधिकारी, यात्रा समिती ची बैठक संपन्न,
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : म्हसवड येथील श्रीसिध्दनाथ देवाची रथ यात्रा २७ रोजी होणार आहे, त्यानिमित्ताने सिध्दनाथ मंदिरात यात्रा समिती ची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी, म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी हजर नसल्याने यात्रा नियोजनाची माहीती देण्यासाठी नगरपालिका शिपाई सागर सरतापे यास अधिकार देण्यात आल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रांत अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार बी.एस.माने,  मुख्य मानकरी अजितराव राजेमाने, जयराज राजेमाने, गोविंद राजेमाने, सालकरी दिलीप किर्तने, नगराध्यक्ष तुषार वीरकर, बाळासाहेब राजेमाने,  धनाजी माने, युवराज सुर्यवंशी, आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर, बीडीओ जी.डी.शेलार,  एपीआय गणेश वाघमोडे, उपअभियंता आर.एस.इंगळे, प्रा.विश्वभंर बाबर, नगरसेवक धनाजी माने, नगरसेवक अकिल काझी, नगरसेवक विकास गोंजारी आदी मानकरी व अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी यात्रा काळात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार बाई माने यांनी दिला आहे. यावेळी पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, वीज पारेषण विभाग, सार्वजनिक बांधकाम,  जिल्हापरिषद विभाग रथ मानकरी, ग्रामस्थ यांनी यात्रेसाठी नियोजन केले. म्हसवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरात पाणी पुरवठा, एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात येणार आहे. यात्रा पटांगणात नळ कनेक्शन देण्यात येणार आहेत. वीजेच्या तारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच यात्रा काळात दहिवडी, पळशी, माळशिरस वीज पुरवठा केंद्रातून ऐनवेळी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यात्रा काळात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे वीज मंडळाच्या अधिकारी यांनी सांगितले. शहराच्या बाहेर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असून यात्रेच्या मुख्य दिवशी शहरात वाहने सोडली जाणार नाहीत. पोलीस स्टेशन तर्फे टेहाळणी टावर उभारण्यात येणार असून १५० जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. जादा ५० महिला पोलीस कर्मचारी मागणी म्हसवड पोलिसांनी केली आहे. शहरातील गटारे, रस्ता, रोज सफाई करण्यात येणार आहे, शहरात फॉगींग करण्यात येत असून निरजंतुकरण करण्यात येत आहे. शहरातील स्वच्छता गृहे स्वच्छ केली असून फिरत्या शौचालयाची सोय केली आहे. २० फिरते शौचालय उपलब्ध करण्यात आली आहेत. शहरातील महत्वाच्या ठिकाणी ही शौचालये ठेवण्यात येणार आहेत. म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राने शहरात  तीन आरोग्य पथके तयार करण्यात येणार आहेत. चार रुग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहेत. एक रुग्णवाहिका रथापुढे ठेवण्यात येणार आहे. एक यात्रा पटांगणात एक ठेवण्यात येणार आहे. दोन फीरत्या ठेवण्यात येणार आहेत. १३ ठिकाणीचे पाणी नमुने तपासणी करून घेतली आहे.
वीरकरवाडी, खडकी, म्ह्सवड, इंजबाव, शिंगणापूर, शिरताव, पुळकोटी या रस्त्यावर साईड पट्या त्वरित भरुन घेण्याचे आदेश यावेळी तहसीलदार यांनी दिले. माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नगराध्यक्ष वीरकर, युवराज सुर्यवंशी, प्रा.विश्वभंर बाबर, सलीम पटेल, संतोष पिसे, सोमनाथ केवटे, अनिल लोखंडे, दिलीप किर्तने, दतात्रय व्हंकारे, सागर सरतापे, यांनी चर्चेत भाग घेतला तर प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, एपीआय गणेश वाघमोडे, बीडीओ शेलार यांनी मार्गदर्शन केले. यात्रा काळात शहरात सी.सी.टी.व्ही.कमेरे बसवून शांततेत यात्रा पार पाडावी असे आवाहन प्रशासकीय यंत्रणे कडून करण्यात आले आहे.

चौकट
 यात्रेची चेष्टेचा विषय झाले आहे. शहरात 200 जणांना डेंग्यू झाला आहे. आरोग्य विभाग झोपले आहे. नगरपालिकेच्या जवळ खड्डे आहेत. तेथे पाणी साठले आहे. यामुळे साथीचे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यात्रा काळात नगरपालिका रस्त्यावरील दुकान बंद ठेऊ नयेत.
नगरसेवक अकिल काझी

जे लोक रस्ता करण्यासाठी आडवे आले, तर गुन्हा दाखल करा. जे कामगार काम करणार नाहीत त्यांच्या वर कारवाई करावी.
अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी

लाईट चेक केली असून ,जनरेटर सोय केली आहे.  24 तास पाण्याची सोय केली आहे., नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र सोय केली असून सांडपाणी  बाहेर जाण्यासाठी व्यवस्था केली असून मंदिर परिसरात ४ दिवस पोलीस बंदोबस्त द्यावा.
देवस्थान ट्रस्ट


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise