शिक्षक रंगले शाळेच्या आठवणीत, जनरल एस.पी.पी. थोरात अकॅडमीच्यावतीने बालदिन साजरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 15, 2019

शिक्षक रंगले शाळेच्या आठवणीत, जनरल एस.पी.पी. थोरात अकॅडमीच्यावतीने बालदिन साजरा.
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माधवनगर:  मी खेडेगावातला. आमची शाळा पण कौलाचीच होती. गुरुजी खुप मारायचे पण चांगलं शिकवायचे. माझे गुरुजी आणि माझ्या शाळेमुळंच मी आज तुमच्यासमोर शिक्षक म्हणून उभा आहे. मला माझ्या शाळेची आजही खुप आठवण येते. अशा भावना काल शिक्षकांनी व्यक्त केल्या.
नवभारत शिक्षण मंडळ संचलित जनरल एस.पी.पी. थोरात अकॅडमीच्यावतीने काल बालदिन वेगळ्याच पध्दतीने साजरा करण्यात आला. अकॅडमीतील सार्याश शिक्षकांनी मुलांना आपापल्या शाळेतील आठवणी सांगितल्या आणि त्या सांगताना तेच जुन्या आठवणीत हरवून गेले. आपली गावाकडची शाळा, शाळेतले दोस्त, दहावीचा अभ्यास, उनाडक्या केल्यावर गुरुजींचा खाल्लेला मार हे सारं सांगताना शिक्षक भुतकाळात हरवले होते. डी.एस. माने, मोहन कोळेकर, विनायक खोत, बी.टी.शिंदे यांच्यासह सार्या  शिक्षकांनी आपल्या आठवणी सांगितल्या.
स्वागत व प्रास्ताविक इनचार्ज सौ. समिता पाटील यांनी केले. पी.यु.कुंभार यांनी बालदिनाचे महत्व सांगितले. एन.व्ही. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. आभार रतन टाकमारे यांनी मानले. जीवन कदम यांनी संयोजन केले

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise