किरण सोहनी यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 15, 2019

किरण सोहनी यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
माणदेश एक्सप्रेस न्युज 
करगणी : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणे यांच्यातर्फे २०१९  सालासाठी दिला जाणारा गुणवंत शिक्षक, गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार गोमेवाडीचे किरण सोहनी यांना जाहीर झाला आहे.
किरण सोहनी हे जि.प. शाळा हिवतड येथे सह. शिक्षक म्हणून शिक्षणाचे काम करीत आहेत. त्यांनी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवून शाळा नावारूपास आणलेली आहे. समाजातील विविध सामाजिक कार्यक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात. सदर पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदरचा पुरस्कार दि. १५ नोव्हेंबर १९ रोजी कोथरूड, पुणे येथे जाहीर समारंभात दिला जाणार आहे.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise