कॉ. गिताबाई शिरतोडे कर्तृत्वान महिला सन्मान व कॉ बळवंत शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार कॉ. स्मिता पानसरे, नागराज मंजुळे यांना जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 14, 2019

कॉ. गिताबाई शिरतोडे कर्तृत्वान महिला सन्मान व कॉ बळवंत शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार कॉ. स्मिता पानसरे, नागराज मंजुळे यांना जाहीर

माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा/प्रतिनिधी : कॉम्रेड गिताबाई बळवंत शिरतोडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तृत्वान महिला सन्मान पुरस्कार भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्रायच्या अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे तर कॉ. बळवंत शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांना जाहीर झाला असल्याची माहिती मारुती बळवंत शिरतोडे व पुरस्कार निवड समिती यांच्या वतीने देण्यात आली आहे. 
गुरुवार दि. २१ रोजी ४.०० वा. वाझर ता. खानापूर, जि. सांगली येथे सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार ज्येष्ठ लेखक नाटककार राजा शिरगुप्पे यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य शरद (भाऊ) लाड तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय महिला फेडरेशनच्या महाराष्ट्रच्या राज्य अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे ह्या आहेत. कार्यक्रमाच्या  स्वागताध्यक्षपदी  वाझर गावचे सरपंच संजय (बापू) जाधव आहेत.
तरी सदर पुरस्कार सोहळा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक कॉम्रेड मारुती बळवंत शिरतोडे व पुरस्कार निवड समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.दैनिक मानादेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise