पंढरपूर येथील अपघातामध्ये म्हसवड येथील एकाचा जागीच मृत्यू . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 21, 2019

पंढरपूर येथील अपघातामध्ये म्हसवड येथील एकाचा जागीच मृत्यू .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/प्रतिनिधी : गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या चारचाकी वाहनाच्या अपघातात एकजण जागीच ठार तर अन्य दोनजन किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजुन ४५ मिनिटांनी सुपली ता. पंढरपुर येथे घडला आहे. अजिंक्य नंदकुमार ढोले (वय ३० रा. म्हसवड ता.माण) असे मृताचे नाव आहे. 
याबद्दल अधिक माहिती अशी की, म्हसवड ता. माण येथील अजिंक्य नंदकुमार ढोले, मनोज मुरलीधर भोजने व स्वप्निल भिमाशंकर टाकणे हे तिघेजण आपल्या कामानिमीत्त पंढरपुर येथे आपल्या मालाकिची असलेल्या मारुती डिझाईर (एम. एच. ०२ इ. एच. ४९७८ या चारचाकी वाहनातून निघाले होते. त्यांची गाडी पंढरपुर तालुक्यातील सुपली या गावानजीक आली असताना या गावाच्या हद्दीत गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्यांची चारचाकी गाडी पुलावर असलेल्या कठड्याला धडकली. यामध्ये पुलाच्या कठड्यावरील लोखंडी बार तुटल्याने गाडी पुलावरुन खाली कोसळली.
या अपघातामध्ये डिझाईर चालक-मालक अजिंक्य नंदकुमार ढोले (वय ३०) यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्याशेजारी बसलेला स्वप्निल टाकणे (वय २३) व पाठीमागे बसलेले मनोज मुरलीधर भोजने (वय ५१) हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच म्हसवड शहरातील अनेकांनी पंढरपूरकडे धाव घेतली. अपघातामध्ये मृत झालेले अजिंक्य ढोले हे म्हसवड येथील गोल्डन गणेश मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. या घटनेनंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार विरकर व नगरसेवक संग्राम शेटे यांनी तात्काळ पंढरपुर येथे धाव घेवून सदर अपघातातील जखमींची विचारपूस केल. सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये थांबून सर्व सोपस्कर पार पाडले. सदर अपघाताची खबर पंढरपुर ग्रामीण पोलीस स्टेशनला जखमी मनोज मुरलीधर भोजने यांनी दाखल केली असून पुढील तपास पो. कॉ. हिप्परकर एच.के हे करीत आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise