आज आटपाडीत खिलार जनावरांचे प्रदर्शन . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 21, 2019

आज आटपाडीत खिलार जनावरांचे प्रदर्शन .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर : उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त माणदेशातील जातिवंत खिलार प्रकारचे जनावरांचे प्रदर्शन गुरुवार ता 21 नोव्हेंबरला भरणार आहे. जनावरांची निवड करून त्यांना बक्षीस प्रमाणपत्र शिल्ड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात येणार आहे. माणदेशातील आटपाडी यात्रे पासून महाराष्ट्रातील यात्रा सुरु होतात. माणदेशातील जातिवंत खिलार जनावरांना देशभर मागणी आहे. खिलार जनावरांना जी आय मानांकन देण्यात ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फाऊंडेशनचे प्रयत्न सुरू आहे. शासनाकडे मदतीसाठी साकडे घातले आहेत. अत्यंत चपळ, काटक, देखण्या आणि सर्वात जास्त किंमतीच्या खिलार प्रकारच्या जातिवंत खोंड व गायींना मागणी आहे. आटपाडीचा शनिवार आठवडा बाजार शेळ्या मेंढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात माडग्याळ मेंढीला किंमत येते. माणदेशातील खिलाराची विशिष्ट म्हणजे नाकपुडी लालसर, गुलाबी किंवा काळ्या रंगाची असते. मान लांब व रुंद असते आणि मानेखाली पोळी मोठी नसते. माणदेशी खिल्लार बैलाचे वशिंड मोठे व घट्ट असते. कातडीचा स्पर्श मुलायम असतो. शेपूट लांबलचक सापासारखे असते. शेपूट गोंडा काळा व झुपकेदार असतो. अशा वैशिष्ट्याचा माणदेशातील जनावरे प्रसिद्ध आहेत.
 उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रे निमित्त उद्या सकाळी नऊ वाजता खिलार जनावरांचे प्रदर्शन भरणार आहे.जनावरांचे  परीक्षण करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. गायी, खोंड, म्हशी, रेडा आदी जनावरांचे प्रदर्शन पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी होते. प्रदर्शनात निवड झालेल्या जनावरांची वाजत गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise