आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेचा आजचा मुख्य दिवस. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 21, 2019

आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेचा आजचा मुख्य दिवस.माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दि 21 रोजी आहे. यानिमित्त रथ उत्सव मिरवणूक आटपाडी शहरातून निघणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान समिती अध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दिली. यावर्षी उत्तरेश्वर देवस्थानाची मूर्ती मिरवणूक नवीन तयार केलेल्या आकर्षण सागवानी रथातून काढण्यात येणार आहे. आटपाडी शहरात बाजार पटांगण चौकात उत्तरेश्वर देवस्थान मंदिर आहे. या देवस्थानास रथ अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता धार्मिक पद्धतीने पूजन, विधी देवस्थान ठिकाणी करण्यात येणार आहे. नैवद्य दाखवण्याचा कार्यक्रम धार्मिक पद्धतीने मंदिरात होतो. दुपारी दोन वाजता पारंपारिक पद्धतीने  रथ पुजण्याचा मान देशमुख व इनामदार या घराण्यास आहे. तर रथ ओढण्याचा मान माळी समाजास आहे. यात्रेनिमित्त पोर्णिमे पासून दररोज उत्तरेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, रामनाथ मंदिर, म्हसोबा ते कलेश्वर मंदिर अशी धुपारती काढण्यात येथे. रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करणे, नवस बोलणे, आधी प्रथा परंपरा आहेत व त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक व मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी करतात. मंदिरापासून सवाद्य मिरवणूक निघते ते शुक्र ओढा यात्रेतून सांगोला रस्ता, देशमुख गल्ली, एसटी बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, कलेश्वर मंदिर ते उत्तरेश्वर मंदिर नेण्यात येते. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने मानकऱ्यांचा सत्कार केला जातो.  यावर्षी नवीन रथाचे आगमन झाल्याने त्या रथाचे दर्शन व पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. 
आटपाडी ग्रामपंचायतीचे सरपंच वृषाली पाटील. उपसरपंच प्रा अंकुश कोळेकर, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायतीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, उपसभापती दिलीप खिलारी, सचिव शशिकांत जाधव, देवस्थान कमिटीचे दिलीप माळी, अजय कुमार भिंगे, सुरेश बालटे, बाबासाहेब माळी आदी प्रमुख कार्यकर्ते यात्रा पार पाडण्यासाठी उत्सव साजरा करण्यासाठी झटत आहेत. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise