आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेनिमित्त मसाला दूध वाटप संभाजीशेठ पाटील मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम. : उपक्रमाचे दुसरे वर्ष - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 21, 2019

आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेनिमित्त मसाला दूध वाटप संभाजीशेठ पाटील मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम. : उपक्रमाचे दुसरे वर्ष


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी ग्रामदैवत उत्तरेश्वर यात्रेनिमित्त संभाजीशेठ पाटील मित्र परिवाराच्या वतीने यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मसाले दूध वाटप करण्यात येणार आहे.  या मसाला दुध उपक्रमाचे वाटप ५ शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 
विविध सामाजिक कार्यक्रमातून सुप्रसिद्ध असलेले संभाजीशेठ पाटील यांचा हा दरवर्षीप्रमाणे नित्य उपक्रम राबविला जात असून या वर्षीचे हे दुसरे वर्ष आहे. छ. संभाजी राजे युवा प्रतिष्ठान व जगदंब ग्रुप अध्यक्ष गणेश रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुमारे दोनशे ते तीनशे लिटर दूध वाटप करण्यात येणार आहे. मोफत मसाले दूध वाटप उपक्रमाने रथ मिरवणूक दिवशी यात्रेची शोभा वाढणार आहे.
आटपाडी ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती व उत्तरेश्वर देवस्थान समिती यांच्या संयुक्तपणे आयोजित आटपाडी महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाला स्वतः हजर न राहता त्यांनी अर्थसहाय्य केले आहे. तरी  सर्व आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी मसाला दूध वाटप या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संभाजीशेठ पाटील मित्र परिवाराने केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise