दहा लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 16, 2019

दहा लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : पतीसोबत परदेशी राहायचे असेल तर माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून आदिती संकेत शेलार (वय-२३) हिचा सासरच्या मंडळींनी जाचहाट केला. हा प्रकार मुंबईस्थित सांताक्रुज परिसरातील सरनम बिल्डिंगमध्ये ७ जून ते २२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान वेळोवेळी घडला. तिने सासरच्या मंडळींची मागणी पूर्ण न केल्याने तिला माहेरी हाकलून देण्यात आल्याने तिच्या फिर्यादीनुसार ४ जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेजवळील मनजीत ब्लॉसम अपार्टमेंटमध्ये हल्ली वास्तव्यास असलेल्या  आदितीचं विवाह २३ मे २०१९ रोजी हिंदूधर्म रीतीरिवाजाप्रमाणे झाला आहे. सौ. आदितीचा पती संकेत शेलार नोकरीच्या निमित्ताने न्यूझीलंडमधील पोकलॅण्ड येथे हॉटेल हार्टलन्ड येथे काम करीत होता. लग्नानंतर हे दांपत्य मालदीव येथे गेल्यावर सात जून रोजी मुंबईत परतले.
आदिती सासरी नांदत असताना नणंद प्रियांका उमेश शिंदे, नणंदेचा पती उमेश शिंदे, पती संकेत विष्णू शेलार आणि सासु सुमित्रा विष्णू शेलार (सर्व रा. मुंबई) त्यांनी संगणमत करून तुझ्या आई-वडिलांनी लग्नात काहीच खर्च केला नाही, त्या खर्चापोटी माहेरून ५  लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावून तिचा छळ सुरू केला. त्यानंतर न्युझीलंड यायचे असेल तर माहेरून १० लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करण्यात आली. सासरच्या मंडळींची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आदिती हिला तिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन घरातून हाकलून दिले. तिच्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार टंकसाळी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. 

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise