Type Here to Get Search Results !

जि.प.शाळा नं.1 करगणीत बालदिन साजरा




माणदेश एक्सप्रेस न्युज 
करगणी : पंडित नेहरू  यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिनाचे औचित्य साधून जि.प.शाळा नं.1 करगणीत बालदिन साजरा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यानिमित्त बालआनंद मेळाव्याचे आयोजन करणेत आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व खेळांचे आयोजन करणेत आले होते.  यामध्ये वेशभूषा स्पर्धा, बालसभा, बक्षीस वितरण, स्नेहभोजन व फनी गेम्स अशा विविध उपक्रमांनी दिवस सजला. पालकांनी सदर उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला. 
बालसभेचे सूत्रसंचालन इ.4 तील ऋग्वेद चोथे याने केले. तर अध्यक्ष स्थान इ. 3 री तील निरंजन मंडले याने भूषवले. आभार इ.2 री तील अभिजीत ननवरे याने मानले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक सरगर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी उपक्रमांचे नियोजन केले होते.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies