Type Here to Get Search Results !

एस.टी कडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची हेळसांड वेळेत बस सोडण्याची मागणी.




माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस बस स्थानाकातून ग्रामीण भागात जाणारी एस.टी वेळेवर सूटत नसल्यामुळे शाळा सुटल्यानंतर हि दोन ते अडीच तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून वेळेत बस सोडण्याची मागणी होत आहे.
गारवाड, मगरवाडी, गोरडवाडी, मोटेवस्ती या ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे या भागातील सुमारे १५० ते २०० विद्यार्थी शिक्षणासाठी माळशिरस शहरातील विविध शाळामध्ये शिक्षण घेत आहेत. या भागातून शाळेमध्ये येण्यासाठी सकाळी ६.२५ च्या दरम्यान एस.टी. बस आहे. शाळा जरी दुपारच्या सत्रामध्ये असली तरी या विद्यार्थांना जादा तास असल्या कारणाने घरातून लवकरच बाहेर पडावे लागते. या विद्यार्थांना शाळा सुटल्या नंतर आपल्या घराकडे जाण्यासाठी जाणारी बस सातत्याने वेळेवर येत नाही. सकाळी ६ वाजता आलेल्या मुलांना घरी पोहचण्यासाठी रात्रीचे ९ वाजत आहेत. त्यानंतर जेवण करून अभ्यास करण्यासाठी त्यांची मानसिकता हि राहत नाही व वेळ हि मिळत नाही. शासन मुले शिक्षणा पासून वंचित राहू नयेत यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहे. खास मुलींसाठी तर मोफत एस.टी. ची सुविधा करण्यात आली आहे. या विद्यार्थांना साठी खास एस.टी. ची फेरी सुरु करण्यात आली होती. परंतु ती आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थाच्या सुविधेचा परिवहन मंडळाकडून बोजवारा उडाला आहे. या ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी वेळेत एस.टी. सुविधा सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.

लवकरच वेळत बस सोडण्यासाठी प्रयत्न करू- तानाजी पवार
याबाबत पालकांनी अकलूज आगारामध्ये आगार प्रमुख तानाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत योग्य ती उपाययोजना करून लवकरच वेळेत एस टी बस सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगण्यात आले.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies