आटपाडीत खिलार जनावरांचे प्रदर्शन संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

आटपाडीत खिलार जनावरांचे प्रदर्शन संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : श्री उत्तरेश्वर देवस्थानची आटपाडी येथील कार्तिकी जनावरांच्या यात्रेमध्ये खिलार जनावरांचे प्रदर्शन दि. २१/११/२०१९ रोजी बाजार पटांगण आवारातील मंदीरासमोरील जागेत उत्साहात पार पडले. सकाळी १०:०० वाजता हर्षवर्धन देशमुख, सभापती पंचायत समिती, आटपाडी यांचे शुभहस्ते प्रदर्शनास सुरवात झाली. उपसरपंच डॉ. अकुंश कोळेकर यांच्या हस्ते गायीचे पूजन करुन निवडीचा कार्यक्रम पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, डॉ. स्वाती आवारे, मॅडम, डॉ. कांबळे, डॉ. चव्हाण, डॉ. राऊत यांचे परिक्षणाखाली निवडीचा कार्यक्रम चालू झाला. सदर कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती भाऊसो गायकवाड, सदस्य अजयकुमार भिंगे, सुबराव ढगे, विलास गलांडे, आनंदराव ऐवळे, बाजार समितीचे माजी उपसभापती काकासो पाटील, माजी संचालक सुबराव पाटील तसेच ग्रामसेवक गोसावी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, सर्जेराव राक्षे, चंद्रकांत हाके, दिनकर पाटील, माजी उपसरपंच, दिलीप माळी, राजेंद्र बालटे, शेतकरी, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
विजेत्या स्पर्धाकांना शिल्ड, प्रमाणपत्र, बक्षिसाची रोख रक्कम मानपान मान्यवरांच्या हस्ते बाजार समिती, ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आला. व बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तसेच उपस्थित मान्यवरांचे बाजार समितीचे सहाय्यक सचिव नारायण ऐवळे यांनी आभार मानून कार्यक्रम संपलेचे जाहिर केले.
खिलार जनावरे प्रदर्शन घेणेचा उद्देश शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खिलार जनावरांची जोपासना करुन जास्तीत जास्त पैदास करावी शेतकऱ्यांना या गोष्टीची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रदर्शन घेतले जाते
 भाऊसोला गायकवाड
सभापती, बाजार समिती,आटपाडी. 
गाय/कालवड १ वर्षा आतील प्रथम क्रमांक दिलीप नाना माळी,आटपाडी, १ वर्षा वरील प्रथम क्रमांक विभागून जयवंत गोरख शितोळे चिनके, मोहन तुकाराम सागर, आटपाडी, २ दाती चंद्रकांत आनंद ढोबळे, ६ दाती भगवान महादेव सागर, जुळूक गाय प्रथम रघुनाथ शिवाजी लांडगे,  खोंड/बैल १ वर्षा आतील विभागून तानाजी दत्तात्रय चव्हाण, विलास विष्णू पाटील, १ वर्षा वरील प्रथम क्रमांक रामचंद्र पांडुरंग मेटकरी २ दाती प्रथम क्रमांक नजीर यासीन शेख, ४ दाती जगन्नाथ तुकाराम मेटकरी, जुळूक विभागून तानाजी मारुती चव्हाण, विलास विष्णू पाटील रेडा, तुकाराम हरिबा ढोबळे.   

No comments:

Post a Comment

Advertise