Type Here to Get Search Results !

अवैधरीत्या रिक्षामध्ये गॅस पुरवठा प्रकरणी गुन्हा दाखल.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : केगाव येथे एका पत्राशेड मध्ये अवैधरित्या रिक्षामध्ये गॅस भरल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता त्याठिकाणी आरोपी लता दिलीप भोसले रा.जोशी गल्ली बाळे सोलापूर या गॅस हा शिग्र ज्वालाग्रही पदार्थ असतांना तो जवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करून हयगयीचे कृत्य करत होत्या. व तसेच अवैध रित्या रिक्षांमध्ये गॅस भरून देत होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ २७ हजार रुपये किमतीच्या बारा गॅस टाक्या, ६ हजार रुपयांचे दोन इलेक्ट्रिक मोटर, पंधराशे रुपयांचे इलेक्ट्रिक वजन, १ लाख २५ हजार रुपयांची एक रिक्षा असा एकूण १ लाख ५९ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल साहित्यासह मिळून आला.व विकास मलिकार्जुन बिराजदार रा. ४४ रेवणसिद्धेश्वर नगर, विजापूर रोड,सोलापूर हा अवैधरित्या गॅस भरण्यासाठी आलेला असताना मिळून आला. असे चंद्रकांत संभाजी वाबळे सपोनि नेम. फौजदार चावडी पोलिस स्टेशन सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी दीड वाजण्याच्या सुमारास जोशी गल्ली केगाव येथील पत्रा शेड मध्ये घडली.या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास मपोसई तळे हे करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies