Type Here to Get Search Results !

तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेंपो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/ प्रतिनिधी : चालकाच्या निष्काळजीपणामुळे भरधाव वाहनाची धडक लागून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना येथील अक्कलकोट रस्त्यावरील साईनगरात शुक्रवारी रात्री घडली. म. हुसेन इसाक चौधरी असे मृताचे नाव आहे. या अपघातास कारणीभूत असलेल्या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्कलकोट रस्त्यावरील साई नगरातील रहिवासी म.हुसेन इसाक चौधरी (वय-३५) त्याच्या राहत्या घराजवळ पाण्याचे ड्रम शेजारी थांबला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोची (एमएच १३/ ए एक्स ४२२६) जोरदार धडक लागून तो गंभीररित्या जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला.
स्वतःच्या ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणाने चालवून म. हुसेन चौधरी याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी मृताचा भाऊ म. गौस चौधरी यानी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार एमएच १३/ ए एक्स ४२२६ च्या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माळी या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies