Type Here to Get Search Results !

बंद घर फोडून गॅस टाक्यांची चोरी.



माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : शहरात चोरीचे सत्र सुरू सुरू आहेत. मात्र चोरट्यांनी काय चोरला पाहिजे हेही कधीकधी त्यांच्या लक्षात येत नाही. कारण असाच वेगळा प्रकार सोलापुरातील विजापूर रोड परिसरात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, मेघा सुधीर नातू (वय-५६) रा. ब, सोनामाता नगर,आरटीओ ऑफिसच्या पाठीमागे,विजापूर रोड,सोलापूर यांच्या फिर्यादीवरून मुकुंद दव यांचे बंद घराचे घरात दरवाजाचे कुलूप तोडून घरामधील असलेल्या दोन गॅस टाक्यांची चोरी झाल्याची घटना घडली. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. व त्यानंतर त्या चोरट्याने घरा मध्ये प्रवेश केला. व त्यानंतर फिर्यादीच्या घरात भाड्याने राहणाऱ्या मुकुंद जाधव यांच्या घरातील दोन हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या दोन गॅस टाक्या मुद्दामून लबाडीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक माडे हे करीत आहेत.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies