श्रीनाथ विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

श्रीनाथ विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस.संजय हुलगे : श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज,माळशिरस याठिकाणी संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. दि.२० बुधवार ते दि.२३ शुक्रवार पर्यंत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मैदानी, फनी गेम्स, बौध्दिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, धावणे, लिंबू चमचा, तीन पायी शर्यत, स्लो-सायकल, गोळा फेक, भाला फेक, रांगोळी, मेहंदी काढणे, मराठी व इंग्रजी हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, शटल रन, संगीत खूर्ची व सामान्य ज्ञान स्पर्धा आशा वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी सांगितले. 
विद्यालयात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा व विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालयात दरवर्षी हा क्रीडा महोत्सव राबविला जातो तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व विद्यार्थी व बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Advertise