आटपाडी यात्रेत मसाला दुध वाटप . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

आटपाडी यात्रेत मसाला दुध वाटप .


आटपाडी/प्रतिनिधी  सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक संभाजीशेठ पाटील मित्र परिवाराच्या वतीने आटपाडीच्या यात्रेत काल मोफत मसाले दुधाचे वाटप करून, “दारू पिऊ नका दूध प्या” असा संदेश दिला. आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थान देवस्थानची कार्तिक यात्रेचा कालचा  मुख्य दिवस होता. या यात्रेत जगदंबा ग्रुप व संभाजी शेठ पाटील मित्र मंडळातर्फे स्टॉल उभारून दिवसभर मोफत मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.  दूध पिण्यासाठी यात्रेकरूंनी स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. आटपाडी शुक्र ओढ्यात पौर्णिमेपासून यात्रा भरली आहे या यात्रेत त्यांनी प्रथम यात्रेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सामाजिक संदेश देणारी कमान उभी केली आहे. तर यात्रा कमिटीला  त्यांनी अर्थसहाय्य केले.  संभाजीशेठ पाटील हे तमिळनाडू येथे गलाईचा व्यवसाय करतात. वर्षभर ते सामाजिक उपक्रम व प्रबोधनाचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे व गणवेश वाटप केले आहे. गावातील अनेक मंडळांना त्यांच्या उपक्रमात सहकार्य करण्याची भूमिका ते घेतात


आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whatsapp group मध्ये join होण्यासाठी click करा. 

No comments:

Post a Comment

Advertise