Type Here to Get Search Results !

भिमराव मासाळ यांच्या मेंढ्याच्या कळपाने धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक




माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : मासाळवाडीतील भीमराव मारुती मासाळ यांच्या मेंढ्याच्या कळपाने धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकाविला तर, पळशीतील सागर दिनकर जाधव याने द्वितीय क्रमांक पटकविला मुढेवाडी च्या नाना तातोबा मुढे यांनी   तृतीय क्रमांक  पटकाविला. गोंदिरातील शंकर नाना मेटकरी यांच्या मेंढराच्या कळपाने चौथा क्रमांक मिळवला.
आटपाडीचे उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त काल  मेंढ्या पळविण्याची शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या. या शर्यतीत हौशी मेंढपाळांनी सहभाग नोंदविला. या  शर्यतीचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप खिलारी, पंचायत समिती सदस्य रुपेशकुमार पाटील, उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर, ॲड. धनंजय पाटील, बाजार समितीचे संचालक अजयकुमार भिंगे, टी.डी. पाटील, विष्णुपंत अर्जुन, ग्रामपंचायत सदस्य बाळासो मेटकरी, चंद्रकांत हाके, प्रकाश मरगळे, सोमेश्वर भिंगे, ग्रामसेवक गोसावी, बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांच्यासह मेंढपाळ, पदाधिकारी, व्यापारी, ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
 पंच म्हणून शशिकांत जाधव, बाळासो मेटकरी यांनी काम पाहिले. अंबाबाई मंदिर रस्ता ते बाजार पटांगण या रस्त्यावर मेंढ्या पळविण्याची शर्यती दुपारी पार पाडल्या. त्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. आटपाडी येथील उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार शुक्र ओढा परिसरात भरला. या बाजारात 50 लाखापेक्षा अधिक रुपयांची उलाढाल शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून झाली. यात्रेस  जिल्हा परिषद चे समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी भेट दिली त्यांचे स्वागत सरपंच सौ. वृषाली पाटील, उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर यांनी केले.
आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थान बाजार पटांगणात आहे. या मंदिरात यात्रेनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काल  माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यात्राकाळात यात्रेनिमित्त आटपाडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. थोर साहित्यिक ग.दि. माडगूळकर यांचाजन्म शताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभानिमित्त यात्रेत कार्यक्रम आयोजित केले आहे. नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर भाजपचे  खासदार संजयकाका पाटील यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies