Type Here to Get Search Results !

रस्ते कामासाठी नागज ते चोरोची मार्गावरील वाहतुक ढालगाव मार्गे वळविली


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : गुहागर-चिपळूण-कराड-विटा-खानापूर ते कर्नाटक हद्द हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ई असा घोषित झाला असून या संपूर्ण रस्त्याची पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यापैकी नागज-जत-मुचंडी ते कर्नाटक हद्दीपर्यंतचे 75 टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. नागज ते चोरोची (कि.मी. 0/00 ते 7/500) मध्ये मातीकाम खडीकरणाचे काम प्रगतिपथावर असून रेल्वे क्रॉसिंग च्या ठिकाणी पुलाची रूंदी फक्त 5 मीटर असल्याने चालू कामांमधून वाहतूक चालू ठेवणे धोकादायक आहे. तसेच काँक्रीटीकरणाचे काम झाल्यानंतर  28 दिवस क्युरिंग कालावधीमध्ये सदर रस्त्यावर ट्राफिक या रस्त्यास समांतर रस्त्यावर म्हणजे नागज-ढालगाव-चोरीची या मार्गाने वळवणे गरजेचे आहे. यासाठी वहातुक नागज-ढालगाव-चोरीची या मार्गाने वळवण्यासाठी पोलीस विभागास सहकार्य करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

दैनिक मानादेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies