Type Here to Get Search Results !

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली तर्फे घरोघरी विधी सेवा माहिती अभियान




माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली: संपूर्ण सांगली जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि सर्व तालुका विधी सेवा समिती मार्फत दिनांक 9 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घरोघरी जाऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या अभियानाची सुरूवात राष्ट्रीय विधी सेवा दिनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वन प्रबोधिनी, कुंडल येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते झाली. 
श्री. पाटील यांनी विधी सेवा माहिती अभियानाची माहिती घरोघरी जाऊन देवून गरजु लोकांना त्यांचे अधिकार विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळवून द्यावेत, असे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश ए. एन. पाटील, सातवलेकर, जगताप, पेरमपल्ली, दिवाणी न्यायाधीश केस्तीकर, इंदलकर, रुद्रभाटे यांनी विविध कायद्यांची माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे सचिव विश्वास माने यांनी केले. आभार न्यायाधीश पलुस श्री. सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा वन अधिकारी श्री. भोसले, श्रीमती कट्टे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्री. नागणे,  मोरे आणि माळी यांनी सहकार्य केले.


दैनिक मानादेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies