सैन्यात भरतीसाठी पैसे मागणी करत असल्यास नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

सैन्यात भरतीसाठी पैसे मागणी करत असल्यास नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा.                                                                                                       माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : महाराष्ट्र राज्यातील 6 जिल्ह्यातील व गोवा राज्यातील 2 जिल्ह्यातील पात्र पुरूष उमेदवारांची सैन्य भरती दि. 17 ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत शिवाजी स्टेडीयम रत्नागिरी येथे होत आहे. भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक आहे. यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची देवाण घेवाण होत नाही. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुठल्याही दलालांची आवश्यकता नाही. दलाल किंवा कुठलीही मध्यस्थ व्यक्ती सैन्यामध्ये भरती करू शकत नाही. जर कुणीही व्यक्ती किंवा दलाल सैन्यात भरती करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी करत असेल तर नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाशी संपर्क साधा, असे सेना भर्ती कार्यालय, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise