कडेगाव येथील श्रीमती विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृह बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू : राधाकिसन देवढे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

कडेगाव येथील श्रीमती विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृह बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू : राधाकिसन देवढे.


                                                                                   माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : यशवंत एज्युकेशन सोसायटी, देवराष्ट्रे या संस्थेमार्फत कडेगाव येथे श्रीमती विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात विद्यार्थी व कर्मचारी नसणे या कारणामुळे वारंवार वसतिगृह व्यवस्थापनास सूचित करण्यात आले होते. याची तपासणीही मार्च 2019 अखेर वेळोवेळी भेटी देऊन करण्यात आली. तथापी वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने याची दखल न घेतल्याने तसेच प्रत्यक्ष भेटी वेळी विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित न राहील्याने चालू शैक्षणिक वर्षापासून सदरचे वसतिगृह बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सन 2017-18 पासून आजअखेर या वसतिगृहास समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली मार्फत कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात आलेले नाही. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise