Type Here to Get Search Results !

आटपाडीत आजपासून संविधान सप्ताह व्याख्यानमालेचे आयोजन: संविधान ग्रंथदिंडीचे होणार सुरुवात; फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे आयोजन.





 माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आटपाडी च्या वतीने राजारामबापू हायस्कूलच्या पटांगणवर दि. २० ते २६ नोव्हें. या कालावधीत सलग ७ दिवस भव्य संविधान सप्ताह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.


राजारामबापू हायस्कूलच्या क्रीडांगणावर दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात संविधान ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथदिंडीचे उद्घाटन आटपाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांचे हस्ते दु. १२. ०० वा. होणार असून आटपाडी शहराच्या मेन व्यापारी पेठेतून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.तर व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयकर आयुक्त मुंबई चे सचिन मोटे साहेब आहेत. तर स्वागताध्यक्ष विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात आहेत.  

गुरुवार दि. २१ रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते तथा शिवनिश्चल ट्रस्ट, पुणे चे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी यांचे भारतीय संविधान हे फुले शाहू आंबेडकर विचारांचे यश या विषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि. २२ रोजी प्रसिद्ध व्याख्यात्या सुनंदाताई भोस यांचे भारतीय संविधानावरील वाढती आक्रमणे एक गंभीर समस्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि. २३ रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळ पुणे चे अध्यक्ष प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांचे भारतीय संविधानाचे भवितव्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दि. २४ रोजी जेष्ठ पत्रकार व साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांचे आम्ही भारताचे लोक या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. २५ रोजी संविधानाचे कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नुर महाराज यांचे  भारतीय संविधान आणि संत साहित्य या विषयावर संविधानावर आधारित कीर्तन होणार आहे. तर दि. २६ रोजी कार्यक्रमाची समाप्ती होणार असून जेष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ. धनाजी गुरव यांचे लोकशाहीतील समाज व्यवस्था आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानमालेचे हे ५ वर्ष असून याचा लाभ नागरीकानी घ्यावा असे आवाहन विचारमंच अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे. या व्याख्यानमालेमुळे जेष्ठ पुरोगामी विचारवंत के.डी.शिंदे, डॉ. दीपा श्रावस्ती, राहुल कदम, प्रा.डॉ. श्यामसुंदर मिरजकर, जेष्ठ विचारवंत बाबुराव गुरव, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रा.डॉ. प्रकाश पवार, अॅड. योगेश मोरे, अॅड. संदीप नंदेश्वर, प्रा. भालचंद कांबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी, जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर, प्रसिद्ध वक्त्या प्रा.डॉ. सुषमाताई अंधारे, प्रा.डॉ. भालबा विभूते, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, एबीपी माझा चे संपादक राजीवजी खांडेकर, अॅड. वैशालीताई डोळस, माजी आम. प्रा. लक्ष्मण माने, प्रा.डॉ. सुभाष दगडे, अभ्यासक कॉ. स्मिता पानसरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे इ. दिग्गज व्याख्यातांचा लाभ आटपाडी शहरासह तालुक्यातील नागरिकांना आजपर्यंत झाला आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whatsapp Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies