करगणीत मारहाणीत महिलेचा खून; आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल; चौघांना अटक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 20, 2019

करगणीत मारहाणीत महिलेचा खून; आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल; चौघांना अटक.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : करगणी येथील मंदाकिनी जितेंद्र काळे  हिचा मारहाणीत खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे  तर आठ जणांविरोधात विद्या निहाल काळे वय 15 हिने पोलिसात  तक्रार दिली आहे. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता करगणी येथील पेट्रोल पंपाजवळ पारधी समाजाच्या पालात घडली.
सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासर्यारला जाब विचारणार्याी पत्नीचा पतीसह आठ जणांना बेदम मारहाण करून निर्घुणपणे खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित सासूने सासरा जिच्या उर्फ जितेंद्र काळे, लैला माचिस पवार, आरती रंजीत पवार, संजय जगळया काळे, राजा तुकाराम पवार, माचिस तुकाराम पवार, महेश माचिस पवार, सनी माचीस पवार सर्व रा. करगणी यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  मंदाकिनी जितेंद्र काळे वय 35 ह्या महिलेला पोटात, छातीत, पाटीत खाली पाडून मारहाण केली. डोक्यास मार लागल्यामुळे ती मयत झाली. याप्रकरणी पोलिसांनी लैला माचिस पवार.  आरती रणजीत पवार. संजय जगळ्या काळे. माचिस पवार चौघांना अटक केली.  त्यांना सांगलीच्या विशेष न्यायालयात काल  हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना 25 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे करीत आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whatsapp Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.


No comments:

Post a Comment

Advertise