इंदिरा गांधी यांची जयंती साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 20, 2019

इंदिरा गांधी यांची जयंती साजरी.


                                                     माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी स्व. इंदिराजींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी प्रदेश पदाधिकारी 
मुझफ्फर हुसेन, प्रकाश मुगदिया, राजाराम देशमुख, राजन भोसले, मोहन जोशी, रत्नाकर महाजन, माजी आमदार सुभाष चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते.


No comments:

Post a Comment

Advertise