उत्तरेश्वर यात्रेत स्वागत कमान लक्षवेधी विविध कमानीवर सामाजिक संदेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 14, 2019

उत्तरेश्वर यात्रेत स्वागत कमान लक्षवेधी विविध कमानीवर सामाजिक संदेशन्यूज माणदेश एक्सप्रेस
आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी चे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा 12 रोजी कार्तिक पोर्णिमा पासून सुरू झाली आहे.  उत्तरेश्वर यात्रेनिमित्त यात्रेकरूंची स्वागत करणारी स्वागत कमानी आटपाडी ग्रामपंचायत आटपाडी व सुरज अपार्टमेंटचे मालक संभाजीशेठ पाटील यांनी उभारल्या असून त्या लक्षवेधी ठरत असून या स्वागत  कमानीतून विविध प्रकारचे सामाजिक संदेश देण्यात आलेले आहेत.
मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, गुणवान मुली देशाची संपत्ती. तसेच बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश प्रेरणादायी आहे. स्त्री, माता, मुलगी या आपल्या संस्कृतीच्या रक्षक आहेत. त्यांचे रक्षण हे आपल्या आद्यकर्तव्य आहे. आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका, जेवण करताना शेतकऱ्याचं व झोपताना जवानाचा आभार मानायला विसरू नका  तसेच वकिलांची गरज आपल्याला एकदा भासेल, डॉक्टरांची वर्षातून एकदा पण शेतकऱ्यांची गरज दिवसातून तीन वेळा भासते. हे स्मरण राबलेल्या त्या हातांसाठी असा संदेश यातून दिलेला आहे. व साथ तुमची हाक आमची असाही आपुलकीचा संदेश या कमानीच्या माध्यमातून यात्रेतील भाविक भक्तांना व आटपाडी शहरातील सर्व नागरिकांना देण्यात आलेला आहे.
संभाजीशेठ पाटील हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. अनेक गरजू तरुणांना त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. आटपाडी तालुक्यामध्ये छ. संभाजी राजे युवा प्रतिष्ठान व जगदंब ग्रुप या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी  आपल्या लोकउपयुक्त कामाचा ठसा उमटवला आहे.  त्यांनी केलेल्या  कामाची पोचपावती म्हणून त्यांच्याकडे तरुण वर्ग आकर्षित होत आहेत.
उत्तरेश्वर यात्रेनिमित्त सुद्धा विविध प्रकारचे उपक्रम संभाजीशेठ पाटील यांच्या सहकार्यातून  राबविण्यात येणार आहेत.
आटपाडी ग्रामपंचायत आटपाडी व संभाजी शेठ पाटील आटपाडीतील सर्व नागरिकांनी यात्रेत येऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.


दैनिक मानादेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise