मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले सेवाभावी संस्था करगणी च्या वतीने करगणी ते आळंदी दिंडी चे आयोजन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विठ्ठल ढोबळे यांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 14, 2019

मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले सेवाभावी संस्था करगणी च्या वतीने करगणी ते आळंदी दिंडी चे आयोजन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विठ्ठल ढोबळे यांचे आवाहनमाणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले सेवाभावी संस्था करगणी यांच्यावतीने दिनांक 20 ते 23 नोव्हेंबर रोजी करगणी ते आळंदी दिंडी चे आयोजन केले असल्याची माहिती विठ्ठल ढोबळे यांनी दिली.
या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांची सर्व सोय मोफत केली जाणार आहे तसेच यावेळी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जाणार आहेत.
संस्थेच्या वतीने दरवर्षी करगणी  ते आळंदी मोफत दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. गेली 9 वर्षे सेवा अविरतपणे सुरू असून यंदाचे १० वे वर्ष आहे. या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना चहा, नाश्ता, जेवण राहण्याची व येणे जाण्याची सोय संस्थेच्या वतीने केली जाणार आहे.
तसेच संस्थेच्या वतीने तीर्थक्षेत्रांचे भेट देण्यात येणार असून यामध्ये जेजुरी येथील खंडोबा, शिखर शिंगणापूर महादेव मंदिर, सोरटी येथील सोमनाथ मंदिर, नारायणगाव येथील मिनी बालाजी मंदिर व पाली येथील खंडोबा यांचा समावेश आहे,
विठ्ठल ढोबळे, शिवाजी दबडे, राजाराम सरगर, अजित इनामदार, अॅड. विक्रम पाटील, वशीम मुल्ला, सुरेश लांडगे यांच्यावतीने भाविकांची सोय केली जाणार आहे. त्यामुळे करगणी व परिसरातील तसेच आटपाडी तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विठ्ठल ढवळे यांनी केले आहे.

दैनिक मानादेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise