कांदा गेला १०० रुपये किलोवर ; अवकाळीचा पावसाचा परिणाम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 13, 2019

कांदा गेला १०० रुपये किलोवर ; अवकाळीचा पावसाचा परिणाम


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : गेल्या काही दिवसापासून खांद्याची दर वाढल्याने खवय्यांची पंचाईत झाली असून रोजच्या आहारात लागणारा कांदा 80  ते 100 रुपये किलो झाल्याने खायचे वांदे झाले असून गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे. चवीने खाणाऱ्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांची लज्जत वाढवणाऱ्या कांद्याने जेवण आळणी बनवले आहे. गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या आवक वर झाला असून हॉटेल, खानावळ इथे कांद्याऐवजी काकडी, टोमॅटो याचा वापर वाढल्याचे चित्र दिसत आहे.
 तर बस स्थानकाजवळ हात गाड्यावर चाळीस रुपये पाव किलोने कांदा भजी विक्री होत आहे. आठवडे बाजारात इतर भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने ग्राहक उन्हात जायचे टाळत असून दुपारी चार नंतर स्वस्तात भाजीपाला मिळेल या आशेने गर्दी होत आहे. कांदा भजीला कांदा परवडणत नसल्याने केवळ दहा रुपयात दालचा राईस हात गाड्यावर मिळू लागल्याने तेथे गर्दी वाढत असून केवळ दहा रुपयात पोटाची भूक भागत आहे. कांद्याचे दर कमी होईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या आहारात कांदा मात्र गायब झाला आहे.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise