Type Here to Get Search Results !

श्रीम. क्षीरसागर यांना राष्ट्र निर्माण पुरस्कार प्राप्त





माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/वार्ताहर : जि.प.प्रा.शाळा पाटीलवस्ती व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने राष्ट्र निर्माण पुरस्कार शिक्षिका श्रीम. क्षीरसागर प्राप्त झाल्याबद्दल  तासेच माळशिरस नं.१.चे केंद्रप्रमुख कुंभार यांच्या निरोप समारंभा निमित्त सन्मान सोहळा संपन्न झाला. 
कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन निकम यांनी केले. यावेळी शाळेतर्फे व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या वतीने क्षीरसागर व त्यांचे पती सतिश गायकवाड व उपस्थित पाहुण्यांचा श्रीफळ, गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
 यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका- गोरे व निकम यांच्यावतीने क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. तर क्षीरसागर यांनी शाळेच्या विधायक कामासाठी शाळेला ५००० रुपयांची  देणगी दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती वाघमोडे व सर्व सदस्य, शिक्षणतज्ञ दशरथ वाघमोडे, पालकवर्ग तसेच अनिल जाधव, थोरात, दिक्षित उपस्थित होते.

दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies