म्हसवड यात्रेपुर्वी म्हसवड- वरकुटे रस्ता दुरुस्त करा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 15, 2019

म्हसवड यात्रेपुर्वी म्हसवड- वरकुटे रस्ता दुरुस्त करा.

माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड ते वरकुटे हा रस्ता वाहतुकीस योग्य राहिला नसल्याने म्हसवड यात्रेपुर्वी म्हसवड- वरकुटे रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहेत.  वरकुटे व परीसरामध्ये परतीचा मोसमी पाऊस भरपुर प्रमाणात झाला आहे त्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठले होते. त्यामुळे रस्ता खचला असुन तो वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. 
याच रस्त्याचे शेजारी माणगंगा नदीमध्ये गेल्या महिन्यात वाळूचे लिलाव झाले होते वाळूने भरलेल्या वाहनांमुळेही या रस्त्याच्या दुरवस्थेत भरच पडली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण फेब्रुवारी २०१० मध्ये करण्यात आले होते तेव्हाही या रस्त्याच्या साईडपट्टया भरलेल्या नव्हत्या, त्यामुळे सर्च रस्ता व साईडपट्टी यामध्ये एक फुटापासून दीड दोन फुटापर्यंत अंतर पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांची खरोखरच तारेवरची कसरत होत आहे. अनेक वेळा समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देण्यावरून भांडणेही होत आहेत.
येत्या २७ तारखेस म्हसवड येथील सिद्धनाथाची रथयात्रा होणार आहे. यावेळी लाखो भाविक या रस्त्यावरून ये-जा करीत असतात त्यांनाही हा त्रास होणार आहे हे टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी होत आहे.
चौकट 
 चुकीच्या फलकामुळे प्रवास बुचकाळ्यात 
याच रस्त्याशेजारी म्हसवड जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीचा मार्गदर्शक फलक लावला असल्याने दुर अंतरावरून आलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्मान होत असून आपण मार्ग तर चुकलो नाही ना याची चॊकशी करुन पुढे प्रवास करावा लागत आहे.
चौकट 
कामानिमित्ताने मला दररोज रांजणी ते म्हसवड असा प्रवास करावा लागतो. या रस्त्यापैकी वरकुटे ते म्हसवड हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला असून कधी समोरून किंवा पाठीमागून येणारे वाहन अंगावर येईल हे सांगता येत नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने पाठीचे मणक्यांचे विकार लोकांना होऊ लागले आहेत.
 संतोष दोलताडे,ग्रामस्त रांजणी.
चौकट 
नोकरीच्या निमित्ताने मला दररोज फलटण ते म्हसवड असा प्रवास करावा लागतो फलटण पासून वरकुटे पर्यंतचा रस्ता चांगला आहे पण तेथून पुढे म्हसवड पर्यंत मात्र रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. दहिवडी गोंदवले मार्गेही रस्त्याचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे त्यामुळे इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था झाली आहे.
सचिन मठपती, फलटण.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise