आटपाडीत आज रक्तदान शिबिराचे आयोजन: फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने रक्तदात्यांना हेल्मेट, कुकर भेट मिळणार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

आटपाडीत आज रक्तदान शिबिराचे आयोजन: फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने रक्तदात्यांना हेल्मेट, कुकर भेट मिळणार.                                                                                माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आटपाडीच्या वतीने संविधान जनजागृती सप्ताह व्याख्यानमाला  निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली.
आटपाडीतील राजारामबापू हायस्कूल सदरचे रक्तदान शिबिर आज दिनांक 23 रोजी ९ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच च्या वतीने दरवर्षी संविधान जनजागृती सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली जाते. व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष असून यानिमित्त प्रथमच विचार मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, रक्तदानाचे कार्य महान कार्य आहे. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विचार मंचच्या वतीने रक्तदात्यांना प्रोत्साहनपर हेल्मेट किंवा कुकर भेट दिली जाणार आहे.
त्यामुळे मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन राजेंद्र खरात यांनी केले आहे. सदरचे रक्तदान शिबिर सांगोला येथील रेवनील ब्लड बँकेच्या सहकार्याने संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise