Type Here to Get Search Results !

प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांचे आज व्याख्यान .




माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आटपाडी आयोजित  संविधान जनजागृती सप्ताहानिमित्त आज पुणे येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांचे
“भारतीय संविधानचे भवितव्य” या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विजय लोंढे हे आहेत.
विचार मंचच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी संविधान
सप्ताहानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. आज दिनांक 2३  रोजी पुणे येथील प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांचे व्याख्यान आटपाडी शहरातील राजारामबापू हायस्कूलच्या  भव्य पटांगणावर सांय. ६ ते  ९  या वेळेत होत असून व्याख्यानानंतर भोजनदान होणार आहे.  व्याख्यानासाठी आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विचारमचंचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे. तर सदरचे व्याख्यान हे दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या युट्युब चॅनेल व फेसबुक पेज वरती लाइव्ह सुद्धा करण्यात येणार असल्याने दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या युट्युब चॅनेल लाईक, शेअर व सबक्राईब करा तसेच फेसबुक पेज ला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies