Type Here to Get Search Results !

माळशिरस येथे तरूणाचा गळा आवळुन खुन




माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस येथे एका तरूणाचा गळा आवळुन खुन झाल्याची घटना काल दि.१० नोव्हेंबर रोजी राञी घडली असुन योगेश औदुंबर गुरव वय २३ रा.माळशिरस असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत माळशिरस पोलीस ठाणे येथे  अज्ञात इसमाच्या विरोधात  पोलिसांत भादवि कलम ३०२ अन्वये नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश गुरव हा १० नोव्हेंबर रोजी बाजार तळ येथील आपल्या घरातुन सव्वाआठच्या सुमारास बाहेरून जेवन करून येतो म्हणुन घरातुन गेला तो परतलाच नाही. तो दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तारेने गळा आवळल्याच्या आवस्थेत योगेशचा मृतदेह पाटबंधारे विभाग येथील डाक बंगल्याच्या आवारात आढळुन आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर लगेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेहाचा पंचनामा करून  त्याची ओळख पटवली व शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत तीन  ते चार जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात  घेतले असून. याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ महेश गुरव याने माळशिरस पोलिसांत दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू व पोलिस निरीक्षक विश्वभंर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके करीत आहेत.   
https://chat.whatsapp.com/CGnv6I36PO222a2mhnhHAb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies