Type Here to Get Search Results !

कलाकार मानधनाचे प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर पर्यंत द्यावेत : राधाकिसन देवढे


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली :  जिल्ह्यातील वृध्द साहित्यिक व कलाकार मंडळी यांनी सन 2019-20 या वर्षाकरिता कलाकार मानधनाचे प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत संबधित पंचायत समितीमार्फत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली कडे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी केले आहे.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत 2018-19 ते 2020-21 या 3 वर्षाकरीता जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीची निवड करण्यात आलेली आहे.  मानधन प्रस्तावासाठी इच्छुक कलाकारांनी विहित नमुन्यातील अर्ज, 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेबाबतचा दाखला (शाळा सोडलेचा दाखला आवश्यक), उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला (48 हजार रुपये पर्यंत), आकाशवाणी, राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर प्रमाणपत्रे, कार्यक्रम व कार्याचे पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स / रहिवाशी दाखला, 100 रूपये स्टँपवर नोटरी, कलाकाराचे आधार लिंक केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी  कागदपत्रासह गटविकास अधिकारी यांच्यामार्फत परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. पात्र प्रस्तावांचा विचार जिल्हास्तरीय वृध्द मान्यवर कलाकार समिती करणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies