हॉर्न का दिला नाही म्हणून डोक्यात घातली वीट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 12, 2019

हॉर्न का दिला नाही म्हणून डोक्यात घातली वीट


माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : गर्दीच्या ठिकाणी हॉर्न का दिला नाही या कारणावरून डोक्यात वीट घालून जखमी केल्याची घटना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रणजित बबनराव पांडुळे (वय-३४) रा. धर्माधिकारी प्लॉट, आडवा गाडेगाव रोड, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यांना आरोपी शुभम दीपक लोणारी, बाळू ज्ञानदेव आदाटे दोघेही राहणार बार्शी यांनी वडाळा येथे हॉर्न का दिला नाही या कारणावरून चिडून जाऊन शुभम लोणारी याने फिर्यादी  रणजित पाडुळे याच्या डोक्यात वीट घालून जखमी केले. व आरोपी बाळू आदाटे यानेसुद्धा फिर्यादीच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. ही घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास समाचार चौक येथील राज्यश्री ट्रेनिंग मटेरियल दुकान समोर घडली. या बाबत आरोपी विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोना. बहिजें हे करीत आहेत.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा.
https://chat.whatsapp.com/CGnv6I36PO222a2mhnhHAb

No comments:

Post a Comment

Advertise