Type Here to Get Search Results !

फोन लावण्याचा बहाणा करून मोबाईल पळविला


माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : मोबाईलवर फोन लावून द्या असे सांगून नजर चूकवून मोबाईल पळवून नेल्याची घटना फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ऐमन म. रफिक शेख (वय २१) रा. ४२७ बेगम पेठ, सोलापूर व फिर्यादीचे चुलत बहीण दोघेही उभारले असताना एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला व तो अनोळखी इसम तुमच्या मोबाईल वरून फोन लावून द्या महत्त्वाचे काम आहे असे सांगू लागला. त्यावेळी फिर्यादी ऐमन शेख याने त्या अनोळखी इसमाला नंबर लावून दिला. त्यावेळी तो अनोळखी इसम फोनवर बोलत बोलत फिर्यादीची नजर चुकवून फिर्यादीच्या संमतीवाचून १५,९९९ रुपयाचा मोबाईल पळवून नेला. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान चॅरिटेबल हॉस्पिटल सिद्धेश्वर पेठ,सोलापूर येथे घडली. याबाबत अनोळखी इसमाचा विरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राठोड हे करीत आहेत.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies