Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी संपूर्ण कर्जमाफी देणार; परंतू अवकाळीच्या नुकसानीची मदत देण्याची भूमिका : उद्धव ठाकरे




माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खानापूर व कडेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष, डाळींब, कलिंगड आणि टोमॅटो पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर आमदार विश्वजीत कदम, नितीन बानुगडे-पाटील, तानाजीराव पाटील, संजय विभूते, प्रांताधिकारी शंकरराव बर्गे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदि उपस्थित होते. 



यावेळी बोलताना ते म्हणाले, सरकार म्हणून जी आवश्यक ती सर्व मदत करता येईल ती लवकरच नक्की करू. राज्यात महाशिव आघाडीचे लवकरच सरकार बसणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपण संपूर्ण कर्जमाफी तर देणार आहोतच. पण सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याची आमची भूमिका आहे. शेती आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू राहिल.
त्यांनी विट्यातील श्रीराम उत्तम लोटके यांची डाळिंब बाग आणि प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ठाकरे यांना आमदार अनिलराव बाबर यांनी पीक विम्याचे संरक्षण देताना विमा कंपन्यांनी विम्याची मुदत बदलली पाहिजे तसेच द्राक्षबागेला व डाळींब बागेला गारपीटीपासून संरक्षण देण्यासाठी सेटनेटचे अच्छादन देण्यासाठी शासनाने मदत किंवा अनुदान द्यावे अशी मागणी केली होती. परंतु, त्यावरही अद्याप निर्णय झालेला नसल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. 
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी खचून जावू नये असा धीर देवून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व शेती पिकांच्या नुकसानीबाबत पंचनाम्याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच विटा येथे अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सहाय्यता व मदत केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies