जलसंधारणामुळे गाव आदर्श बनले : स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 16, 2019

जलसंधारणामुळे गाव आदर्श बनले : स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटीलमाणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : तरंगफळ ता. माळशिरस येथील तरुणांनी एकत्र येऊन जलसंधारणाची उत्कृष्ट कामे केल्यामुळे तरंगफळ गाव एक आदर्श गाव बनले असे प्रतिपादन शिवशंकर बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी केले. त्या तरंगफळ येथे वन विभागाच्या वतीने केलेल्या जलसंधारण व वृक्ष लागवड व कृषी विभाग लघुसिंचन विभाग महाराष्ट्र शासन यांचेमार्फत केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी तरंगफळ येथे आल्या होत्या.
यावेळी त्यांनी सिमेंट साखळी बंधारे, नालाबांध, डीप सीसीटी, लूज बोल्डर, वन विभागाच्या केलेल्या गिनी मारवल, मद्रास, अंजन, डोंगरी, काल, धामण या जातीच्या गवताची पाहणी केली व ग्रामस्थांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच ज्ञानू उर्फ माऊली कांबळे, माजी सरपंच सुजित तरंगे, किरण तरंगे, सचिन तरंगे व विभागाचे गोरख तरंगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise